शोध अस्तित्वाचा (भाग २)

  • 12.4k
  • 5.6k

वैशालीताईंना सब इनस्पेक्टर मानेंनी समिधाची फोनवर सर्व माहिती दिली आणि कॉन्स्टेबललl हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन थेट समिधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले. "निवारा", एक दुमजली इमारत.. इथेच समिधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती.. कॉन्स्टेबल समिधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेला.. समिधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली.. तिने समिधाला आत यायची खूण केली..तिला बसायला सांगितले..तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली.. त्या बाईने बोलायला सुरुवात केली, "समिधा नाव न तुझे, ही तुझी मुलगी ना? किती गोड आहे ग!!" समिधा एकटक तिच्याकडे बघत होती.. ती पुढे म्हणाली," अरे!!मी माझा परिचय तुला