शोध अस्तित्वाचा (अंतिम भाग)

(14)
  • 15.6k
  • 2
  • 4.4k

समीधाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती. एके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला. तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून आला होता. समिधाने तो उचलला. समिधा : हॅलो, कोण बोलतंय. समोरची व्यक्ती : नमस्कार, मी नीलिमा बोर. चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतेय.तुम्ही समिधा बोलताय का? समिधा : हो. बोला ना मॅडम. नीलिमा : तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ५ उमेद्वारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे. तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल, तसेच कंपनी तुमचा राहण्याचा सर्व खर्च करेल. बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर