कोरोना व्हायरस ऑनलाइन शिक्षण व प्रश्न

  • 9k
  • 2.4k

14. कोरोना व्हायरस;ऑनलाइन शिक्षण व प्रश्न कोरोना व्हायरसनं नाकी नव आणलं आहे. दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत आहे. तसेच भीतीच्या सावटाखाली देशातील जनमानस वावरत आहेत. असे असतांना शाळा सुरु करण्याची घाई पालक करीत आहेत. पालकाचे शाळा सुरु करण्यावरुन दोन गट पडले आहेत. एक म्हणजे शाळा सध्या सुरु करु नये असे म्हणणारा गट व दुसरा शाळा सुरु करा म्हणणारा गट. सरकारही शाळा सुरु करण्यावर विचार करीत आहे. पण त्यांना वाटते की जर शाळा सुरु केलीच तर आधीच वाढणारी कोरोनाची साथ. त्यात शाळा सुरु केल्यास दुपटीने वाढ होईल. काही पालकांनाही तेच वाटते. म्हणून ते शाळा सुरु करण्याच्या पलिकडचे आहेत. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार शाळा