ओथंबलेले संवाद.

  • 8.5k
  • 1
  • 2.3k

ओथंबलेले संवाद : डॉ अनिल कुलकर्णी.आज संवाद इतके दुस्तर झाले आहेत की, कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. मायेचं अस्तर गळून पडलं की संवाद दुस्तर होतात. पुर्व एकत्रकुटुंब पद्धतीमध्ये धाकाने संवाद होत नसतं. आता यंत्राने होत नाहीत. संवाद होण्यासाठी सहवास आवश्यक आहे. सहवास नसतानाही दूर अंतरावरूनही संवाद साधता येतो.प.नेहरूंनी जेल मधुन आपल्या मुलीशी संवाद साधला,भावनिक पोषण केले.कुठे गेली ती पत्रे,माणसांना हसवणारी,रडवणारी,घडवणारी? संवादासाठी माणसे उपलब्ध नसतील व मनाची दारे उघडी असतील तर संवाद निर्जीव वस्तूशीही होतो. महाभारत, रामायण,ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, यामधून संस्काराचे, संवादाचे संक्रमण चालू आहे. काही गोष्टींना मरण नाही. मृत्यूनंतरही त्यांचा कर्तुत्वामुळे माणसे जिवंत असतात, कारण त्यांचा संवाद चालूच असतो.