प्रेम म्हणजे प्रेम असत- १२

  • 12k
  • 5k

प्रेम म्हणजे प्रेम असत- १२ रितू ने तिचे विचार स्पष्टपणे जय ला सांगितले होते आणि जय ने सुद्धा रितू चे विचार शांतपणे ऐकून त्यावर नीट विचार करून त्याची मते मांडली होती.. रितू च्या विचारांना नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. दोघांचा संसार फक्त एका गोष्टी भोवती फिरणारा नव्हता.. यांच्या संसारात दोघांच्या मतांना किंमत होती.. त्यामुळे अगदी भांडण जरी झाले तरी कोणीतरी एक पायरी खाली यायचा आणि हेच दोघांच्या सुखी संसाराचे गमक होते. नी जय ने रितू ला एकदम उत्तम रित्या समजून घेतले होते.. रितू ची मते चुकीची अजिबातच नव्हती.. जर मातृत्व झेपणार नसेल तर ते रितू च्या मनाविरुद्ध लादणार नव्हता जय..