होतं असं कधी कधी !...

  • 15.9k
  • 1
  • 5.2k

होतं असं कधी कधी !... ती सायंकाळची वेळ होती , उन्हाळ्यातले दिवस असल्यामुळे सूर्य अजून पश्चिमेला रेंगाळत होता ,आसपास पसरलेला त्याचा संधिप्रकाश मनाला एक अनामिक हुरहूर लावत होता . शहरातली एक गजबजलेली बाग , लहान मुलं खेळतायत , पालक गप्पा मारतायत , कोणी जॉगिंग करतंय , कोणी हिरवळी वर बसून गप्पा मारतंय , दूर एका कोपऱ्यात २४-२५ वर्षांची एक युवती शांतपणे एका बाकावर बसलेली दिसली . साधारण मध्यमवर्गीय वेषभूषा , कुणाचंही लक्ष वेधून घेईल असा देखणा चेहेरा ,माझं कुतूहल चाळवलं , का अशी ही एकटी बसली असेल ? काही दुःख असेल का हिला ? कोणाची वाट बघत