चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 2

  • 6.1k
  • 2.3k

" चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या!" || भाग - दोन || राज आणि राहूल दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकाच वर्गात शिकायचे. एकाच हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये राहायचे. राज जितका अवखळ तितकाच राहूल शांत आणि संयमी होता. दोघांच्या वागण्यात, स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असला तरी दोघांमधली मैत्री घनिष्ठ होती. राज थोडा वात्रट होता खरा पण तो अगदीच वालंटर नव्हता. म्हणूनच तर राज सिमरनच्या मागे लागलेला असल्याचं ठाऊक असूनही राहूल काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. सिमरन राहूलची सख्खी धाकटी बहीण होती. " काय यार... आज पुन्हा एकदा तुझ्या बहिणीने थोबाड फोडलं माझं.. " कण्हत कुंथत राज राहूलला सांगू लागला. " त्यात नवीन काय