एन्जॉय लाईफ यार! - भाग 1

  • 6.7k
  • 1
  • 1.7k

कथा :एन्जॉय लाईफ यार!“What’s are you say? Oh no, so sad yaar!” मंगेशच्या हातातील मोबाईल पलीकडील सागरच्या बातमीने अलगद खाली पडला. मंगेश कसाबसा सावरला. ऐकावे ते नवलच होतं. त्याला दरदरून घाम फुटलेला. या बाबीला कदाचित आपणच जबाबदार असल्याची अपराधी भावना त्याच्या मनात रूंजन घालू लागली. पुढे काय करावे ते त्याला सुचेना. मंगेशने खिशात कोंबलेला रूमाल काढीत घाम टिपला. बाजूच्या खुर्चीवर बसत त्याने क्षणभर छताकडे बघितले. डोळयातून अश्रू पाझरू लागलेले. खिडकीच्या बाहेर बघत तो विचारचक्रात बुडाला. त्याला घडलेल्या काही घटनांचे प्रसंग आठवू लागले. ‘संज्या, काय यार तू जगतोस? अरे तू मास्तर आहेस. चांगला पन्नास हजार पगार कमवितोस. पण काय कामाचं? अरे, स्वतःसाठी तरी