प्रारब्ध भाग १३ रोज रात्री न चुकता परेशचा व्हिडीओ कॉल येत असे . तिचा तो मोठा नवीन रंगीत फोन आणि व्हिडीओ कॉल बघुन मामा मामी आणि मुलांना सुद्धा गंमत वाटत असे . परेश त्यांच्या सोबत पण बोलत असे . किती मनमिळावु आणि समजूतदार जावई आहे असे वाटे त्यांना . चार दिवस झाल्यावर सुमनची सासरी जायची वेळ झाली . आता दोन तीन दिवस ती तिकडे राहणार होती मग परेश आला की त्याच्या सोबत परत जायची होती . फक्त शेवटच्या दिवशी दोघांना जेवायला बोलावले होते मामांनी इथूनच ते बस मध्ये बसणार होते . सुमनला सासरी सोडायला मामा स्वतः गेले होते . गेल्यावर