प्रेमात पडताना...!

  • 7.9k
  • 2.6k

सकाळी लवकर उठून आज तुषार तयार झाला होता.त्याची आई नेहमीप्रमाणे हा लवकर असा उठला की काहीतरी शंका घेत त्याला हजार प्रश्नांची उधळण त्याच्यावर करायची.कारण पण तसच होतं कारण रोज आठ वाजेपर्यंत झोपणारा मुलगा कधी चुकून गजर लावला तर न चुकता बंद करून पुन्हा अंथरूणामध्ये साखर झोपेसाठी जायचे.आणि कित्येक हाका मारल्या तरी काही केल्या न उठणारा हा मुलगा लवकर उठला की,शंका तर येणारच...! तसा तुषार मुलगा हुशार तर आहेच.पण त्याची उत्तम कलाकार म्हणून सुद्धा ओळख आहे.तो कॉलेजला सर्वांच्या नजरेतून काही सुटत नव्हता.कारण कॉलेजच्या शिपाई पासून ते प्राचार्यापर्यंत सर्वांच्या परिचयाचा असा हा तुषार. आज नेहमीच्या वेळापत्रकाला कलटी देऊन आज सर्व मित्रमंडळी