चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 3

  • 7.5k
  • 2.4k

" चार आण्याचं लव्ह.. बारा आण्याचा लोच्या "|| भाग - तीन ||" लल्लू नहीं, लल्लन हैं... बडेही बदचल्लन हैं! " अचकट विचकट हसत तो अंजलीच्या समोर येऊन उभा राहिला. लल्लन. युपी की बिहारच्या कुठल्यातरी गावगुंड लीडरचा हा वंशज. आजोबा पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आले. नाही नाही ते धंदे गेले. बापाच्या काळात जम बसला. आणि हे दिवटे तर 'दादा'च होऊन बसलेत. अंजलीच्या कॉलेज मध्ये तिच्याच वर्गात शिकत होता हा लल्लन. शिकणं म्हणजे काय... नुसतं नावालाच. दादागिरी करणे, पोरींची छेड काढणे, सिगारेटी फुंकत, बाईक डूरकावत उंडारणे हेच त्याचे मुख्य धंदे. खिशात बापजाद्यांचा पैसा अन् अंगात तारुण्याची मस्ती. परिणाम व्हायचा तोच झाला. मागेपुढे चार