जोडी तुझी माझी - भाग 8

(14)
  • 13.2k
  • 7.9k

गौरवी फ्रेश होऊन येते आणि बाबा सोफ्यावर टीव्ही बघत बसले असतात त्यांच्या बाजूला येऊन बसते. गौरवी - बाबा मला तुम्हाला काही सांगायचं आहे, खर तर त्यासाठीच मी येथे आले आहे. पण मला एक वचन द्या की तुम्ही माझी पूर्ण गोष्ट संपल्याशिवाय मधात बोलणार नाही. चिढणार नाही आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही. गौ बाबा - काय झालं बाळा? सासरी सगळं ठीक आहे ना? त्रास तर नाही ना दिला कुणी तुला? गौरवी - नाही हो बाबा खूप चांगले आहेत सगळे, माझी खूप काळजी घेतात, मला कोण त्रास देईल. गौ बाबा - मग काय सांगायचंय, सांग तू मी नाही बोलणार तुझं झाल्याशिवाय.