पोळ्यावर कोरोनाची मारबत

  • 10.3k
  • 2.3k

19. पोळ्यावर कोरोनाची मारबत सध्या देशात तसेच जगात कोरोनाचा संसर्ग चरणसीमेवर आहे. त्या अनुषंगाने लोकांनी गर्दी करु नये व कोरोना पसरु नये म्हणून सरकार नवनवे नियम लावत आहे. त्यातच ज्या भारतीय सणाला लोकांची गर्दी जमते. ते सण साजरे करण्यासाठी देशाने काही नियम बनवले आहे. याच नियमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या चक्रव्युहात बैलाचा पोळाही फसला आहे. हे कोरोनाचे चक्रव्युह केव्हा भेदता येईल हे सांगणे कठीण आहे. पोळा...... बैलाचा सण. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा होतो. लोकं जी बैलजोडी शेतीकामाला शेतक-यांना वर्षभर मदत करते. त्या बैलाच्या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षी विदर्भातील शेतकरी श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी तो दिवस बैलपोळा म्हणून साजरा करतात. नव्हे