कोरोना व्हायरस डॉक्टरांची चांदी, सामान्यांचे हाल

  • 8.9k
  • 2.5k

21. कोरोना व्हायरस;डॉक्टरांची चांदी, सामान्यांचे हाल भारत स्वावलंबी देश आहे. या देशात राहणारी बरीचशी मंडळी ही देखील स्वावलंबी आहेत. त्यामुळं नक्कीच ते शक्यतोवर कोणाची मदत घेत नाहीत. आजारांच्या बाबतीतही तेच आहे. भारतातील बरीचशी मंडळी ही गरीब असून दारिद्र्यात जीवन जगतात. त्यांच्याजवळ गाठीला जास्त पैसा राहात नाही. पण कधी कधी पोटातही अन्न कोंबायला पैसे नसतात. मग उपाशी पोटीच पाणी पिवून दिवसं काढावे लागतात. त्यातच हा कोरोना व्हायरस आलाय. कोरोना व्हायरस येण्यापुर्वीही ही भारतीय मंडळी आजारी पडत असत. कोणाला किरकोळ सर्दी खोकला व्हायचा. तर कोणाला तापही यायचा. त्यातच अशा सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून ही मंडळी थेट डॉक्टरकडे न जाता औषधालयात जायची व