जोडी तुझी माझी - भाग 9

(12)
  • 13.2k
  • 1
  • 7.7k

दिवसामाघून दिवस जात होते. गौरवी विवेकच्या आणि तिच्याही आईबाबांची काळजी घेत आपली नोकरी सांभाळत होती तर इकडे विवेक आयशाच्या मागे फिरत होता. कुठलीच भीती नाही, कुणी रोकटोक करणार नाही, म्हणून ते दोघे मस्ती मजा करत होते. पण यात एक चांगलं की विवेक जवळपास रोजच घरी फोन जरूर करायचा. एकदिवस बाबांनी त्याला कधी येतोय म्हणून विचारलं, पण त्याने 'आता नाही जमणार खुप काम आहे' म्हणून टाळलं .4 महिने तिकडे राहिल्यावर आई बाबांच्या रोजच्या प्रश्नाला कंटाळून त्याने भारतात आई बाबांना भेटायला यायचं ठरवलं. आणखी पुढे 2 महिन्यांतरच तिकीट बुकिंग केलं. तस आई बाबांना सांगितलं . गौरवी बाहेर गेली होती. ती घरी येताच आईने