एक छोटीसी लव स्टोरी - 1

  • 11.3k
  • 1
  • 5.2k

आज कॉलेजचा रस्ता फुलून गेला होता. कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. जुने मित्रमैत्रिणी आपले ग्रुप शोधत होते तर नवीनच आलेले विद्यार्थी थोडे घाबरले होते...नवीन वातावरण, शाळा सोडून नवीन जगात आले होते त्यात कॉलेजच्या रॅगिंग विषयी ऐकलेले होते...त्यानं मुळे थोडे तणाव होता.... सरस्वती विद्यालयचा बहुतेक मुलामुलींनी इथे एडमिशन घेतले होते तो एक अख्खा ग्रुप एकत्र फिरत नवनवीन गोष्टी बघत होता. एकटा हाच ग्रुप काय तो नवीन कॉलेज, पहिला दिवस एन्जॉय करत होता. लिस्ट वरून आपला वर्ग शोधला, नवीन वर्ग कुठे आहे , आजूबाजूला कोणते वर्ग आहेत, कॅन्टीन ग्राउंड ह्या सगळ्याची हेर गिरी चालू होती....तर ह्या ग्रुप मध्ये होते अक्षय, निनाद, हेमंत