जोडी तुझी माझी - भाग 10

(14)
  • 12.6k
  • 8k

परदेशात आल्यामुळे गौरवीला तिचा जॉब मात्र सोडावा लागला. इकडे आल्यानंतर विवेकने तिला कुठेच बाहेर नेलं नाही. जवळ जवळ 2 महिने उलटून गेले होते, घरात बसून ती ही कंटाळली होती.... म्हणून एक दिवस ती बाहेर पडली. पण अनोळखी देश, अनोळखी लोक, आणि अनोळखी शहर तिला कुठे जायचे काहीच सुचत नव्हतं. असच चालत चालत ती एका मंदिरापर्यंत पोचली. तिला फार आनंद झाला, काही नाही तर देव आणि मंदिर तर ओळखीचं भेटलं. ती रोज काम आवरलं की रिकाम्या वेळात तिथे जाऊ लागली. हळूहळू तिची तिथे येणाऱ्या काही लोकांशी ओळखी झाली. आणि आता ती ही खुलली. पण तिने विवेकला यातलं काहीच सांगितलं नव्हतं (