प्रारब्ध भाग १८

  • 7.1k
  • 3.1k

प्रारब्ध भाग १८ परेश थोडा साशंक झाला ...त्याने जास्त काही विचारू नये म्हणून सुमन म्हणाली “एवढा काय विचार करताय ?..मामी काय खाणार आहे का आपले दागिने .? विश्वास नाही का माझ्या माहेरच्या लोकांवर तुमचा ..? तिचे डोळे मोठे करीत कांगावा करणारे आणि रागावलेले बोलणे ऐकुन परेश थोडा बिचकला. समजुतीच्या सुरात तो म्हणाला ,”तसे माझे म्हणणे नाही ग ..फक्त एकदा दागिने त्यांनी नीट ठेवले आहेत ना हे विचारून घे .. आता पुढल्या महिन्यात दिवाळीला आपण जाणार आहोतच गावाकडे . त्या वेळेस तुला घालायला पण होतील आणि येताना घेऊन येऊ आपण .” “हे बघा तुम्हाला तसा काही संशय वाटत असेल तर स्पष्ट