जोडी तुझी माझी - भाग 11

(12)
  • 12.9k
  • 7.7k

विवेक आपल्यावर रागावणार तर नाही ना असा विचार तिच्या मनात आला आणि आता तिला आत जायची भीती वाटू लागली. विवेक ही इकडे गौरवीचाच विचार करत होता, आपल्याला लागलं तर किती कळवळत होती, आपण किती त्रास दिला तिला तरी सुद्धा अजूनही किती प्रेम करते आपल्यावर, आज माझीच चूक असतानाही स्वतःला दोष देत रडत होती गाडी मध्ये, मी किती मूर्ख होतो की हीच प्रेम समजू शकलो नाही, आजपर्यंत कुठलीच मागणी केली नाही की कुठलाच हट्ट धरला नाही तिने आपल्याकडे , ती करू शकली असती कारण हक्काचा नवरा होतो मी तिचा, पण नाही नेहमी समजून घेतलं मला, आणि आज लागलं मला होतं पण अस