कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२१

  • 8.5k
  • 3.9k

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२१ ------------------------------------------------------------------- रविवारची सकाळ उजाडली होती . खूप दिवसानंतर आजच्या रविवारी काहीही कार्यक्रम नव्हता , त्यामुळेच की काय ..यशच्या घरातील सगळ्यांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत होते. हे काही रविवार ..मजेत जाण्यापेक्षा..मनस्तापाचे गेलेत “ असेच सर्वांना वाटत होते . त्यामुळे साहजिकच सकाळ अगदी आरामशीर वाटत होती. यशचे बापुआजोबा , अम्माआजी , आई-बाबा , नाश्ता –पाणी आटोपून पेपर वाचीत बसले होते . अंजली –वाहिनी आणि सुधीरभाऊ संडे - पिकनिक म्हणून ..त्यांच्या दोस्त कंपनीबरोबर जवळच्या एक रिसोर्टला गेले होते. अशा वेळी यशला एका मित्राचा फोन आला . तो सांगू लागला ..यश ..माझ्या घरी एक प्रोब्लेम झालाय .. आमच्याकडे आलेल्या एका