जोडी तुझी माझी - भाग 20

  • 10.5k
  • 6.1k

राहुल - हम्म... नियती आहे boss.. अशीच खेळते ती..बरं चलं बराच वेळ झालाय, झोपुयात अजून उद्या कामावर जावं लागेल ना...राहुलच्या बोलण्यावरून विवेकला क्लिक होत की ऑफिसला पण जायचंय तो लगेच राहुलला पुन्हा आवाज देत..विवेक - राहुल अरे मी मंदिरात कसा जाऊ मग?राहुल - अरे हो, तू अस कर 2 दिवसाची सूटी घे..विवेक - अरे पण आताच 15 दिवस सुटीवर होतो आता लगेच सुटी मिळणार नाही..राहुल - हा ते पण आहे म्हणा, मग अस कर लवकर ये घरी आणि मग मंदिरात जा..विवेक - हो पण माझी आणि त्यांची वेळ सारखी नसली तर... ते आधीच येऊन गेलेले असले तर..राहुल - होऊ शकते..