जोडी तुझी माझी - भाग 22

  • 10.1k
  • 5.8k

गौरवीला वेकच्या आईचा फोन येत असतो...ते पाहून ती घाबरते, आता काय सांगू तिला सुचत नाही, पण उचलला नाही तर ताण घेतील म्हणून ती उचलते... आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं बोलत असते, विवेक बद्दल विचारल्यावर तो बाहेर गेला आहे सामान आणायला अस सांगून मोकळी होती आणि थोडं बोलून फोन ठेऊन देते.. तिला खूप वाईट वाटत की तिला नेहमी खोटं बोलावं लागतं त्यांच्याशी पण त्यांना दुखावन्यापेक्षा ठीक आहे असा विचार ती करते...फोन ठेवल्यावर तिला विवेकची खूप आठवण येते पण अजूनही तिचा राग गेलेला नसतो.. ती फोन मध्ये त्याचे फोटो बघत असते... तेवढ्यात रुपाली ऑफिसमधून येते, आणि गौरवी लगेच तोंड फिरवून तिचे डोळे पुसते,