जोडी तुझी माझी - भाग 24

  • 11.8k
  • 6.1k

संदीपला त्याच्या मित्राची स्थिती कळते आणि तो मनापासून त्याला मदत करायची म्हणून प्रयत्न करतो.. गौरवी निघून गेल्यावर संदीप एकदा विवेक कडे सहज म्हणून एक फेरी घालून येतो , काकाकाकूंना भेटायला आलो असा बहाणा बनवून तो घरात शिरतो, घरात कुठेच गौरवी दिसत नाही... चहा पाणी घेऊन तो लगेच निघतो..दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुपाली ऑफिसमधून येत असताना रस्त्यात एक ठिकाणी तो तिला बघतो , तो तिला लगेच ओळखून रुपलीच्या मागे जातो.. रुपलीला थांबवत..संदीप - हॅलो, मी संदीप , विवेकचा मित्र.. तुम्ही गौरवी वहिनीच्या मैत्रीण आहेत ना?रुपाली - हो , तुम्ही माझा पाठलाग का करताहेत आणि तुम्हाला कस माहिती की मी तिची मैत्रीण आहे