संतश्रेष्ठ महिला भाग १ माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही . देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेणे यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो . हे काम संत करीत असतात . समाजाला भक्ती मार्गाला लावणे जेणे करून समाजमन बळकट होईल . आयुष्यातील संकटांचा सामना करू शकेल यासाठी संत पुढाकार घेत असतात . संत हे समाजातच असतात पण आपल्या कामगिरीमुळे ते सामान्यातून संतपदी विराजमान झालेले असतात . भारत भूमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. येथे देशोदेशी संत परंपरा आहे . ज्ञानेश्वर ते तुकाराम यासह अनेक संत या मातीत जन्मले . परंतु या पुरुष संतांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी होती.