नभांतर : भाग - ५

  • 7.2k
  • 3.4k

भाग – ५ प्रत्यक्ष बोलून तोडगा काढलेला बरा म्हणून त्याने “मला महत्वाच बोलायचं आहे तुझ्याशी, उद्या कॉलेज संपल्यावर थांब लगेच जाऊ नकोस.” असा मेसेज पाठवला... डिटेकटिव्ह सिनेमे आणि मालिका बघून, तशी पुस्तके वाचून तयार झालेलं याच गुप्तहेर डोक यातील खोच शोधात होता.. नेमक काय झाल आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हे केवळ सानिकाच सांगू शकत होती आणि म्हणून तिच्या उत्तराची वाट बघत बसला..... थोड्या वेळाने मेसेज आल्याची रिंग वाजली. आकाश च लक्ष नव्हत सुरवातीला तो त्याच्याच तंद्रीत होता, मग अचानक त्याला मेसेज आल्याचे कळले तसा तो पटकन उठला आणि चार्गिंग ला लावलेला मोबाईल घेण्यासाठी धावला,