कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २२ वा

  • 7.8k
  • 3.2k

कादंबरी –प्रेमाची जादू भाग -२२ वा ------------------------------------------------------------ १. यश मित्राच्या घरी पोंचला , त्याच्या पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये admit केले . परिचयाचे डॉक्टर ,तिथला स्टाफ माहितीचा ,यात आणखी एक गोष्ट महत्वाची ..एका सेवाभावी संस्थेच्यावतीने चालणारे हे धर्मदाय हॉस्पिटल असल्यामुळे ..इथला खर्च डोळे पांढरे करणारा नाहीये .”.हे यशने अगोदरच सांगितले .. त्यामुळे मित्राच्या घरातील चिंताग्रस्त मंडळींना धीर आला. पेशंटची व्यवस्था लावून झाल्यावर ..मित्र म्हणाला .. चल ,बाहेरच्या हॉटेल मध्ये चहा घेत बोलू ,मला बरे वाटेल . यशने घड्याळात पाहिले .. लंच-टाईम होण्यास थोडाच वेळ शिल्लक होता.., त्यामुळे लंच करून सरळ शो रूमला जाऊन कामाला जुंपून घेणे सोयीचे होईल ,या विचाराने - तो मित्राला