उषा "या संपल्या का सुट्ट्या? आलातं का फिरून?" "फिरून नाही गं हनिमूनला जाऊन."उशी खट्ट्याळ हसतं उद्गारली . गेल्या तीन -चार वर्षापासूनचा आमचा लोकलचा ग्रूप.आमच्या ग्रूपचं सगळं काही ठरलेलं असायचं. म्हणजे बसन्याची जागा ,साजरे करायचे सण,-वार,सुख-दुःख.एवढचं नाही तर कुठल्या सणाला कुठल्या साड्या घालायच्या ते सुध्दा. आमच्या ग्रूपमध्ये एकूण आम्ही सहाजनी .एकदा एकत्र जमलो की धम्माल गप्पा-गोष्टीतं एवढ्या मशगूलं व्हायंचो की मग भोवतालंचं सारं जग आमच्यासाठी अद्रुष्य असायंचं,डब्यातली गर्दी,भांडणं, रेटारेटी ,चेपाचेपी सर्व काही. उषा आमच्यातलीचं एक .दरवर्षी ५जानेवारी ते१५जानेवारी सुट्ट्या घेऊन हनिमूला जानारी.मागच्या तीन-चार वर्षापासून तीचा हा नेम कधीचं चूकला नाही.नीत्यं नियमान ती जायचीचं. एक मात्र होतं की