एक छोटीसी लव स्टोरी - 3

  • 7.9k
  • 1
  • 3.6k

प्रीती आपली बॅग भरायला घेतली..चला म्हणजे आपण बालीला फायनाली जातो आहोत तर...हे बघून निनाद खुश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी घरून निघताना मात्र प्रीतीचा पाय निघत नव्हता सारखे मुलांना कुरवाळून झालं,अनेक सूचना देऊन झाल्या आणि शेवटी रडून ही घेतले... मग मात्र निनाद वैतागला. प्रित्स बस कर ना पाच-सहा दिवसांचा तर प्रश्न आहे. आत्ताच तू इतकी रडते आहे उद्या नीती सासरी गेल्यावर काय करशील आणि प्रीतम उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यावर मला वाटतं तू अमेरिकेलाच पोचशील त्याच्याबरोबर हो ना... गप्प रे... तुला नाही कळायचं आई झाल्यावर काय होतं ते.. अरे... तु आई झाली म्हणून तुला फिलिंगस आणि मी बाप झालो म्हणून मला काही नाही ना.... तुला निदान