गोट्या - भाग 6

  • 7.9k
  • 2.6k

डी. एड. ला नंबर लागल्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी होते. गोट्या देखील मनोमन खुश झाला होता. पण त्याचा नंबर आदिवासी भागातील कॉलेजमध्ये लागल्याने त्याची आई जरा चिंताग्रस्त झाली होती. आदिवासी भाग म्हणजे सर्व जंगली जनावरांचा भाग. माणसं देखील तशीच जनावरांसारखे जंगलात राहतात असे तिला वाटायचे. गोट्याला घराबाहेर राहण्याचा तेवढा अनुभव नाही. ती तिथे कसा राहील ? काय करून खाईल ? या विचाराने ती जरा काळजी करत होती. गोट्या मात्र आता आपण लवकरच गुरुजी होणार याचे स्वप्न पाहू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिवासी भागातील कॉलेजला जाण्यासाठी कागदपत्रे आणि सोबत जेवण्याचा डबा घेऊन तो आपल्या वडिलांसोबत घराबाहेर पडला. त्याच्या घरापासून ते कॉलेज 200