बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 1

(20)
  • 27k
  • 3
  • 17.1k

१. झुंज हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू लागलं. सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली.  दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर आलेला बैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची