बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 8

  • 9.8k
  • 1
  • 4.7k

८. गुंजनमावळ       सुरुवात तर झाली होती. श्री रायरेश्वर मुक्त करून! आपल्या हाती एखादा बळकट किल्ला असावा असे आता सर्वांना वाटू लागले. चर्चा, मसलती झडू लागल्या. शिवापूरचा वाडा मावळ्यांनी गजबजून गेला. मावळ्यांची संख्या वाढू लागली. तान्हाजी, येसाजी, नेताजी यांच्या हाताखाली कसरती होऊ लागल्या.          राजांचा मुक्काम गुंजवणे भागात वाढू लागले. आता लक्ष होतं, तोरणा आणि मुरुंबदेवाचा डोंगर. रायरेश्वरावरून पुण्याच्या दिशेने पाहिलं कि, सिंहगड दिसायचा.त नजर थोडी डावीकडे वळवली कि, आकाशाला गवसणी घालणारा तोरणा नजरेत भरायचा. त्याला लागूनच होता मुरुंबदेवाचा डोंगर! बहिर्जीने मारत्या, सुंदऱ्या, राणोजीला या कामाला लावले होते.         पुणे प्रांतातील सर्वांत