बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 9

  • 10.7k
  • 1
  • 5k

९. मोहीम तोरणा          तोरणा! कानद खोऱ्यातील बुलंद, बळकट आणि अभेद्य असा गड! ढगांशी स्पर्धा करणारा आणि वाऱ्याशी झुंजणारा! जेवढा उंच तेवढाच रुंदही! गडाला दोन माच्या होत्या. मैल अर्धा मैलावर दोन्हीही माच्या पसरलेल्या. एक झुंजार तर दुसरी बुधला! तेलाचा बुधला उपडा करून ठेवला कि, त्याच्यासारखा दिसायचा म्हणून बुधला माची! त्यावर मध्यभागी एक डोंगराचा सुळका होता. त्याच्यावरचा प्रचंड खडक लक्ष वेधून घ्यायचा! भक्कम कातळी तट आणि खाली खोल खोल दऱ्या म्हणून दुसरी माची, झुंजार माची म्हणून ओळखली जायची!झुंजार माचीवरून गडाखाली उतरायला एक वाट होती. अतिशय भयंकर, अवघड आणि चिंचोळी! उतरताना थोडा जरी पाय घसरला, तोल गेला तर कडेलोटच!