लहान पण देगा देवा - 3

  • 9.5k
  • 4.1k

भाग ३ रमला तर एवढा आनंद झाला होता कि ती ताडकन उठून आंनदाने उड्या मारायला सुरुवात केली. आणि आम्ही दोघे देखील डॉक्टर साक्षी चा निरोप घेऊन जायला निघालो. डॉक्टर साक्षी : आजोबा आज्जी नातू येतो आहे या आनंदात औषध घ्याचे विसरू नका, नाहीतर तुमचा नातू माझे कान पकडेल , मी तुमची काळजी घेतली नाही म्हणून. अगं हो ग माझी राणी काळजीच करू नकोस तुलाच माझ्या घरी घेऊन जातो कायमची अथर्व आला कि, म्हणजे माझा नातू कायम माझ्या कडे राहील. डॉक्टर साक्षी : आजोबा राहूदे आता तुम्ही जाऊन आराम करा आणि आजी ला पण त्रास नका देऊ ( हळूच लाजून)