कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२३ वा

  • 8.5k
  • 3.8k

प्रेमाची कादंबरी – जादू --------------------------------------------------- ऑफिसची वेळ संपून गेली होती ..तरी मधुरा घरी जाण्याची घाई करीत नसून ..ऑफिस मध्ये काही उद्देशाने थांबली असावी का ? हा प्रश्न म्यानेजर काकांच्या मनात कधी पासूनचा येत होता. एरव्ही त्यांना विचारूनच ती ऑफिस सोडीत असते . तिचा आजचा हा मूड पाहून म्यानेजर काकांनी मधुराला विचारलेच . काय ,मधुरा .. आज फारच निवांतपणे चालू आहे कामं ? घाई दिसत तुला नाहीये घरी जाण्याची ? तुझ्या चेहेर्यावरील भाव पाहून मला असे वाटते आहे की.. तुला काही तरी विचारयचे असावे .. पण ते मला की यशला विचारणार आहेस ? हे मात्र मला माहिती नाही .. पण