नभांतर : भाग - 7

  • 6.4k
  • 3.1k

भाग – 7 पल्लवीच्या बोलण्याचा आकाश विचार करत होता आपल्याच तंद्रीत हरवून. पल्लवी त्याला म्हणाली, “कॉफी घे गार होतेय बघ...” ----------------********---------------- “अरे ऐकतोयस ना... कॉफी घे ना गार होतेय.” सानिका त्याला त्याच्या विचारांमधून बाहेर काढत म्हणाली. “हो हो घेतो..” अस म्हणत आकाश ने कॉफीचा मग उचलला. कॉफीचा एक घोट त्याने घेतला... “व्वा, १ नं. उत्कृष्ट... सानिका, तुझ्या हातच्या कॉफीला अजूनही तीच चव आहे !” आकाश तिला म्हणाला. यावर “My Pleasure ! नशीब असल तरच मिळते हो अशी कॉफी !” सानिका त्याला टोमणा मारत म्हणाली. “खरय तुझ ! नशीब ! केवळ आणि केवळ नशीब आहे म्हणून तू मिळालीस मला आणि