नभांतर : भाग - 8

  • 6.7k
  • 1
  • 3.1k

भाग – 8 आज सानिकाचा हात हातात घट्ट धरून आकाश आणि सानिका एकमेकांच्या जवळ बसले होते. सानिकाने बघितले तर आकाशच्या डोळ्यात पाणी आले होते. “रडतोयस का ?” सानिकाने त्याला विचारले. “काही नाही ग असच...” त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. “मला माहितीय तू का रडतोयस ते, तू त्या जुन्या आठवणींमध्येच रमला आहेस ना ? किती वेळा सांगितलंय तुला कि ते वाईट प्रसंग परत परत नको आठवूस म्हणून.. आता आहे ना आपण एकत्र.” आकाश ला आश्चर्य वाटले कि तिला कसं काय कळाल असेल मनातल. “मला एक प्रॉमिस कर कि, इथून पुढे कोणताही प्रसंग घडला तर मनात कसलेही विचार येण्यापूर्वी तू माझ्याशी