मी एक मोलकरीण - 7

  • 11k
  • 5k

( भाग 7 ) शहरामध्ये सहा महिने राहिले पण कधी ईतक एकट एकट नाहि वाटलं, आता सर कधीच सोबत नसणार, मला गरज असेल तरीही, मी अडचणी मध्ये असले तरीही ते नसणार. मला या कल्पनेने भरून येत होतं. मी सरांच्या फोटोकडे बघत होते त्यामधून मला फक्त त्यांचे स्वप्न, माझे स्वप्न, कोणत्याही संकटाला कसे सामोरे जायचे, कधीच हार नाहि मानायची असे वाक्य कानावर येत होते. जे त्यांना आवडत नाहि ते मी कधीच केल नव्हतं आणि आतापासून ही फक्त तेच करणार जे त्यांनी सांगितले होतं. मी पहिल्या दिवशी कामावर गेले पण सतत सर समोर येत होते म्हणून काही कामावर जास्त लक्ष नाहि देता