मी एक मोलकरीण - 8

  • 10.5k
  • 4.8k

( भाग 8) आज माझं लग्न होत. मला कळत नव्हतं, नक्की ! मी खुश आहे का नाही ते ? मी कदाचित शरीराने तिथे होते पण मनाने मात्र तिथे नव्हते. पण आई खुश होती म्हणून मी खुश होते. लग्नाची तयारी चालु होती, सर्व व्यस्त होते तितक्यात माझा फोन जोरजोरात वाजत होता. मी फोन उचलण्यासाठी गेले पण आईने फोन माझ्या हातातून घेवून बाजुला ठेवून दिलं. मी तिला समजावत होते,' काहि महत्वाचे काम असेल म्हणून फोन करत असणार, एकदा बोलून तर बघू दे !' पण आई ऐकायला तयार नव्हती तिने माझा फोन बंद करून ठेवून दिला. आता आई मला लग्न मंडपामध्ये घेवून गेली.