दुभंगून जाता जाता... - 4

  • 5.3k
  • 2.1k

4 तसा अभ्यासात पहिल्यापासून मी सर्वसाधारण होतो. परीक्षेमध्ये सर्वसाधारण गुणांनी उत्तीर्ण होण्यापलीकडे विशेष अशी माझी प्रगती नव्हती. पण विविध खेळामध्ये आणि शालेय स्पर्धेमध्ये मात्र मी अव्वल होतो. खेळाच्या सांघिक आणि वैयक्तिक प्रकारामध्ये जिल्हा आणि राज्यस्तरावर शाळेला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्येही मी चमकलो होतो. शालेय परीक्षांचे दिवस होते. मी नववीच्या वर्गाची अंतिम परीक्षा देणार होतो. वर्ष संपत आलं की खूप रुखरुख लागून रहायची. शैक्षणिक वर्ष संपायला नको असे वाटायचे. याचं कारण असं होतं की, आम्हां मुलांचे बालसंकुल मध्ये राहून शिकण्याचे एक ठराविक वय होते. ते ठराविक वय संपल्यानंतर आम्हांला बालसंकुल सोडावे लागायचे. साधारण १०