दुभंगून जाता जाता... - 6

  • 5.8k
  • 2.3k

6 हे बघ राजू, तुझी मावशी तुझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू कोल्हापूरला जाण्याच्या तयारीला लाग. तुला लवकरात लवकर ११ वी च्या वर्गात प्रवेश घ्यायला हवा. खरंतर बालसंकुल सोडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. बालसंकुल प्रशासनाने गुणवत्ता पाहून माझी मुदतही वाढवली होती. आणखी दोन वर्षे मी इथे राहून शिकू शकणार होतो. मला काय करावं काहीच कळत नव्हते. मी जाधव सरांना जाऊन भेटलो. सर , माझी मावशी पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला बोलवते आहे. इकडे बालसंकुलने माझी मुदतही वाढवली आहे. मला काय करावं हेच कळत नाही. यावर जाधव सर म्हणाले... राजू, पुन्हा अशी संधी तुला मिळणार नाही. हवं तर तू दोन वर्षांनी