7 आजी – आजोबा हे जग सोडून गेल्यानंतर जाधव सरांनी एक पालक या नात्याने माझ्यासाठी जे काही करायला लागतं ते सर्व केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ओळखीच्या लोकांना भेटून पुन्हा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी शिकावं,मोठं व्हावं ही त्यांची तळमळ आणि धडपड होती. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, कितीही गरीबी असली, तरी कुणासमोर मन हलकं करू नको, लाचारपणाने, स्वाभिमान गहाण ठेवून कुणापुढेही हात पसरू नको. जे काही करायचं आहे ते कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले पाहिजे. आपली नीतिमत्ता ढळू देऊ नको. चोरी, लबाडी या गोष्टी माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात. माणसामध्ये नम्रपणा, सहनशीलता आणि धैर्य असेल तरच माणूस प्रगती