कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २६ वा

  • 8.9k
  • 3.8k

कादंबरी - प्रेमाची जादूभाग -२६ वा----------------------१.------------चौधरीकाकाकडे मदतीसाठी म्हणून मधुरादुपारीच गेली होती, आजी -आजोबांनाघरी घेऊन जायचे म्हणून ऑफिस संपले की चौधरिकाका पण निघून गेले.त्यांना कबूल केल्याप्रमाणे यश तिकडे जाण्यासाठी निघाला, आणि घरी आल्यावरआई-बाबा देखील तिकडेच आहेत हे कळल्यामुळे यश मनोमन खुश झाला,चौधरिकाकांना तो म्हणाला होता की-कुणाला सांगू नका, मी येतोय ",या बद्दल,हे सांगणे मधुरा ला सर्पराईझ देण्यासाठी होते".आता आई -बाबा दोघे ही तिकडेच ,म्हणजेआपल्या तिकडे येण्यास सगळ्यांची मान्यता मिळाल्या सारखे आहे " हे बेस्टच झाले.चौधरीकाकांच्या घरी जाण्याचे प्रसंग तसे फारसे आलेले नव्हते, उलट आज त्यांच्या कडे पहिल्यांदा जातो आहोत, असे यशाला वाटू लागले.ही ओढ, ही अधीरता त्याच्या मनाला लावली ती मधुराने.त्याला