विवेक आशेने तिच्याकडे बघत होता, पण ती शांत होती काय बोलावे तिलाही सुचत नव्हतं, मनाची परिस्थिती सावरायच्या ऐवजी आणखीच बिघडली होती.. थोडा वेळ दोघेही शांत बसले होते... थोडावेळणी गौरवीनी बोलायला सुरुवात केली.. गौरवी - तुझं बोलणं सगळं ऐकलं मी विवेक पण मला सद्धे काहीच निर्णय करता येत नाहीये.. पुन्हा तीच मनःस्थिती आहे तुझ्यावर विश्वास ठेवू की नको... मी थोडं स्पष्टच बोलते, होऊ शकते तुला वाईट वाटेल पण मी तुझं ऐकलं ना थोडं तू ही ऐकून घे..विवेक पलटून तिच्याकडे बघत असतो, त्याच्याकडे बघून तिला समजतं की हा ऐकायला तयार आहे आणि मग ती बोलायला सुरुवात करते...बघ ना विवेक आधी तुला वाटत होतं