जोडी तुझी माझी - भाग 35

  • 10.2k
  • 5.8k

दोघेही उठतात व निघता निघता..विवेक - गौरवी मला बदली मिळायला वेळ लागेल आणि तुलाही तुझा वेळ हवा आहे.. मी माझं बदलीच आटोपून इकडे परत आल्यावर सांगितलं तर चालेल का?? गौरवी - चालेल, तुझं तू ठरव..विवेक - ठीक आहे.. मला भेटत तर जाशील ना ग कधीतरी..गौरवी - हम्मम..गाडीवर बसून ते घराकडे निघतात.. घरी रुपाली गौरावीला भेटायला आलेली होती आणि त्यांची वाटच बघत असते..त्यांना आलेलं बघून रुपाली त्यांच्याकडे येते आणि हळूच बोलते... रुपाली - अरे वाह.. झालं बोलून?? झालं का मग तुमचं मॅटर solve??विवेक - नाही अजून.. तुझ्या मैत्रिणीला पुन्हा पटवायला यावेळी फार कष्ट घ्यावी लागणार आहेत मला..गौरावी - तू केव्हा आलीस??? आणि आल्या