शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग-२)

  • 6.2k
  • 1
  • 2.9k

आज व्यंकटला पाहिल्यावर राघूभाईला त्याच्यात आपल्या बलपणाची छबी दिसते, एवढा मोठा मॅटर करूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे लवलेशही दिसत नव्हते, तो जसा निडर होता त्याप्रमाणेच त्याला व्यंकट वाटला म्हणून त्याला हसायला आले, आपल्या गँगमध्ये एकदम परफेक्ट माणूस त्याला सापडला होता आणि आशा निडर मुलांच्या शोधत तो नेहमीच असतो. व्यंकटची तिथे नीट सोय करण्यात आली त्याला एक रूम, खायला चिकन बिर्याणी आणि तंदुरी देण्यात आली, तो देखील काहीच न घडल्याप्रमाणे बिनधास्त वावरत होता तिथे असलेल्या पंटर लोकांशी ओळख करून घेत होता. इकडे त्याच्या घरात मात्र खूप गोंधळ उडाला होता कृष्णाला पोलीस घेऊन गेले होते त्यांच्यामागे रमय्या आणि ओळखीतले नातेवाईक पोलीस स्टेशनला