कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २७ वा

  • 9.5k
  • 3.5k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २७ वा ------------------------------------------------------------ १. चौधरीकाकांच्या घरी येण्याचा आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच लकी आहे असे यशला वाटत होते . फराळ –चहा झाल्यवर चौधरीकाका सर्वांना म्हणाले , हे बघा ,आता आजचे रात्रीचे जेवण इथे आपल्या गच्चीवर चांदण्यात करायचे आहे . आणि त्यानंतर आपलीच अशी एक छान संगीत मैफिल करू या , मगच आजचा कार्यक्रम संपेल . यश म्हणाला – अहो चौधरी काका ..हे काय अचानक ठरवलंय ..संगीत मैफिलीचे , तुम्हाला माहिती आहे , बाबा छान गातात ,आई सुगम गीतं म्हणते ,आज्जीला जुनी गाणी म्हणता येतात , बाकी आम्ही म्हणजे ..अंजलीवाहिनी ,सुधीरभाऊ , मी पण त्यात