आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 2

  • 8.3k
  • 3k

भाग २ माझ्या जीवनाचा शिल्पकार तुच होतीस,कारण लहानपणापासून तुच मला घडवत होतीस.लहानपणी तुझे बोट पकडून शाळेत जायला सुुरुवात केेली.तेव्हा शाळेत मन रमेना,पण तुु नेहमी माझ्या सोबत असायची.हळुहळू शिक्षकांची मी आवडती होऊ लागले,कारण प्रत्येक वेळेस शाळेत पहिला किंवा दुसरा क्रमांक असायचा.हे फक्त तु माझ्या सोबत होतीस म्हणून शक्य होतेे.माझ्या प्रत्येक स्पर्धेत नृृत्य,गायन,कोणतीही असो,तु नेहमीच माझ्या सोबत असायचीच.एकदा पाचवी इयत्तेत असताना माझा तिसरा क्रमांक आला.तेव्हा मी खूप निराश झाले होते,खुप रडत होते.तेव्हा तु मला प्रेमाने समजावून जाणीव करून दिली कि अपयश एकदा ना एकदा आयुष्यात तर येतेच, त्याने निराश न होता परत उठून मेहनत