नवदुर्गा भाग ४

  • 6.9k
  • 2.8k

नवदुर्गा भाग ४ चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिचे नदीत कींवा तळ्यात विसर्जन करतात. दुर्गा ही या दिवसात सासरहून माहेरी आलेली असते अशी समजूत आहे. म्हणूनच बंगालमधल्या गृहिणी या माहेरवाशिणीसाठी नाना प्रकारची पक्वान्ने करतात. दुर्गापूजेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुजा मूर्ती बनवतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुरमर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिकेय, गणेश, लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात. या मुर्ती उंच व अवाढव्य असतात . या मुर्ती बनवण्यासाठी दहा ठिकाणची माती वापरली जाते . यासाठी खास करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या अंगणातली माती आणली जाते . देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला स्थान दिलेले असते. या मुर्ती