भाग ९ प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, उत्तम शिक्षण घेतले पाहिजे, सगळ्यांना नीट जपले पाहिजे, पण एक वेळ निघून गेली कि ते पण विसरतात कि हीच स्वप्न आपल्या आई वडिलांनी देखील पाहिलेली असतात, आणि आपण काय करतो तर सगळं संपून टाकतो छोट्या स्वार्था साठी, आपला संसार त्यांना खूप मोठा वाटतो, पण तोच संसार उभा करून देण्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले असतात, जो पर्यंत मी ते जसे वागले तसा वागत नाही तो पर्यंत काहीच बदलणार नाही, आणि आज जर मी हे पाऊल नाही उचललं तर माझा भविष्यकाळ देखील असाच असेल, आणि