शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग -४ शेवटचा भाग)

  • 6.4k
  • 2.4k

राघूभाईचे सर्व क्रियाकर्म विधिवत स्वतः व्यंकट करतो यादरम्यान त्याच्या घरी व्यंकटचे येणे जाणे वाढते, तो त्याची मुलगी रेवा जी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असते तिची आणि राघूभाईच्या पत्नीची रत्नमालाची जिला तो आंटी म्हणायचा त्यांची जबाबदारी स्वीकारतो. व्यंकटला ह्या धंद्याची काडीनकाडी माहिती असते त्यात राघूभाईने दिलेली शिकवण ह्याच्या जोरावर तो खूप कमी वेळात आपल्या गुन्हेगारी धंद्याचा पसारा संपूर्ण मुंबईभर पसरतो त्यात तो एका दुबईच्या ड्रगसच्या धंद्यातील मोठया डॉनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तो आणि त्याचे साथीदार त्या धंद्यात बेसुमार पैसे कमावतात, त्या डॉनमुळेच तो फिल्म इंडस्ट्रितील लोकांच्या जवळ येतो त्यांना ड्रगस पुरवणे, त्यांच्या सुपार्या घेणे ही कामे तो करू लागला आणि गुन्हेगारी क्षेत्रात